Sunday, September 11, 2011

मी..


एक विश्वासू हाथ धरून पुढे चालत होतो.. मी..
एक नवं विश्व पाहण्यास अगदी आतुर होतो.. मी..

नव्या नव्या दिशेने जायची इच्छा ठेवत होतो.. मी..
कसलीच भीती न बाळगता अगदी निर्धास्तपणे पुढे जात होतो.. मी..

'त्या' धरलेल्या हातातून आत्मविश्वास घेत होतो.. मी..
प्रत्येक पाऊल न विचार करता टाकत होतो.. मी..

त्या गर्दीत अगदीच इवलासा वाटत होतो.. मी..
त्या लखलख्त्या विश्वामुळे अगदीच मंत्रमुग्ध झालो होतो.. मी..

पडलो, धडपडलो तरी कोणीतरी सावरेल ह्या आश्वासनाने बिंधास्त चालत होतो.. मी..
चालता चालता असं लक्षात आलं की तो 'विश्वासू' हाथ मागे कधीच सोडवून आलो होतो.. मी..

एक हात मग दुसरा असं करत पुढेच चाललो होतो.. मी.. 
थांबणार तर अजिबात नव्हतो.. मी..

एका अनोळख्या जगात भ्रमण करायची खळबळ मनात साठवून ठेवली होती.. मी..
पुढे चालतच राहायची महत्वाकांक्षा ठेवत होतो.. मी..

स्वतःच्या महत्वाकांक्षापायी बर्याच अपेक्षांचा जीव घेतला होता.. मी.. 
एके बाजूला अपेक्षा तर दुसर्या बाजूला काही अपुरी स्वप्नं.. एका द्वंद्वात अडकलो होतो.. मी.. 

असल्या पेचप्रसंगात स्वतःवरच विश्वास ठेवत होतो.. मी.. 
एक अधुरे स्वप्नं पूर्ण करण्याची जिद्द डोळ्यात भरून ठेवली होती.. मी.. 

त्या लखलखत्या विश्वात एक स्वतःचं स्थान निर्माण करण्यास जुमाने कष्ट घेत होतो.. मी.. 
खरं सांगायचं झालं तर तसं बरंच यश मिळवलं होतं.. मी.. 

स्वतःच्या पायांवर उभा ही राहिलो होतो.. मी.. 
जे जमणार नाही असं एके काळी वाटलं होतं ते सगळं काही करून दाखवलं होतं.. मी.. 

त्या क्षणी वळून पाहिलं तर एकटाच होतो.. मी..
तसा बराच पुढे निघून आलो होतो.. मी..

नजरे समोर यशाचे सिंहासन पाहत होतो.. मी..  
पण मागे लांब क्षितिजा जवळ उभ्या त्या 'विश्वासू' हातांची ओढ जाणवत होतो.. मी.. 

नव्या महत्वाकांक्षा आणि अपूर्ण अपेक्षा.. त्या द्वंद्वात नव्याने अडकलो होतो.. मी.. 
तेंव्हा एक महत्वाची निवड केली.. मी.. 

मागे परतण्याचा निश्चय केला.. मी..
अखेर त्या 'विश्वासू' हाताला आता ज्या आधाराची गरज होती, तो होतो.. मी..

अपुरे स्वप्नं तर पूर्ण केले होतेच.. मी.. 
पण एक नवे चित्र कोणीतरी रंगवले होते, ज्याचात होतो.. मी.. 

ते चित्र अपुरे कसं सोडू शकत होतो.. मी..
आता त्या चित्रात रंग भरायची कल्पना करत होतो.. मी..

हळू हळू असं लक्षात आलं जिथून निघालो तिथेच परत येत होतो.. मी.. 
जाऊन अजून कुठे जाणार होतो.. मी.. 

ते हात पुन्हा एकदा धरून ह्यावेळी आत्मविश्वासाने पुढे चालत होतो.. मी..
एका नव्या दिशेने.. एक नवी महत्वाकांक्षा डोळ्यात भरून घेतली होती.. मी.. 

आता कोणत्याच द्वंद्वात नव्हतो.. मी..
कारण महत्वाकांक्षा आणि अपेक्षा, दोन्ही एकाच चित्रात पाहत होतो.. मी.. 

आता मागे वळून पाहण्याची गरज जाणवत नव्हतो.. मी.. 
पुढे आणि फक्त पुढेच चालत राहायचं ध्येय ठेवलं होतं.. मी!!