आज तसा जास्तच दमलो होतो मी.. आठवड्याचा शेवटचा दिवस, म्हणून घरी येताना तितका निवांतपणा. सतत ते काम आणि त्यात असंख्य विचार.. आयुष्य म्हणजे एक न संपणाऱ्या कोळ्याच्या जाळ्या सारखं आहे. आणि माणूस त्यात अडकलेला एक जीव, जितका स्वतःला मोकळं करायचा प्रयत्न करतो तितकाच त्यात अडकत जातो. कधी कामात तर कधी commitments तर कधी.. कोणात. आज दार उघडलं तर ती समोर tv पाहत, तांदूळ निवडत बसली होती. आज शनिवार, तिला तसा half-day. ती घरी असली की मला खूप बरं वाटायचं. नेहमीच्या ठिकाणी bag ठेवली आणि सोफ्यावर डोळे मिटून बसलो. तितक्यात दार वाजलं, उठून दार उघडलं तर समोर एक लहान मुलगा उभा होता. तो माझ्या कडे पाहून हसला आणि घरात आला. चप्पल stand वर ठेवली आणि पाठीवरचं दप्तर माझ्या laptop bagच्या शेजारी. आणि मी बसलो होतो तिथेच सोफ्यावर बसला. मी जाऊन त्याचा शेजारी बसलो तितक्यात ती म्हणाली- "जा सोन्या, हाथ-पाय-तोंड धुवून घे..." तो लग्गेच उठला हाथ-पाय धुतले, कपडे बदलून आला आणि तिचा शेजारी जाऊन बसला. तिचा मांडीवर डोकं ठेवून डोळे मिटून घेतले. तिने हातातली परात बाजूला ठेवून त्याचा कडे पाहिले. "दमलास शाना?" तो काहीच बोले ना. एक चित्ताने तो तसाच पडून राहिला. तिने त्याचा डोक्यावरून हात फिरवले तर त्याने डोळे मिचकावले. उठला आणि तिचा हातांकडे पाहू लागला. "तुझे हाथ किती खर-खरीत आहेत गं!" असं तो पटकन बोलून गेला. तिने त्याचा कडे पाहिले आणि म्हणाली- "माझे हाथ गुळ-गुळीत राहिले तर तुझी भूक कशी भागवू शकेन रे राजा!" तेंव्हा तो म्हणाला- "माझा साठी करतेस का गं इतके कष्ट? नको.. मला नको चांगलं चांगलं खायला.. मला तू हवी आहेस.." असं म्हणून तो पुन्हा तिच्या मांडीवर डोकं ठेवून पडला. त्याचे ते चिमुरडे डोळे पाणावले. मला माझे ही अश्रू थांबवता आले नाही. तसेच बूट काढून डोक्याखाली उशी घेऊन मी ही सोफ्यावर अडवा झालो. अचानक डोक्यावरून कोणीतरी हाथ फिरवण्याचा भास झाला. "तुझे हाथ ही खर-खरीतच आहेत गं! पण आज इतक्या वर्षांने कोणतरी डोक्यावरून हाथ फिरवलाय. खूप बरं वाटतंय. Please मला नको ना गं सोडून जाउस." असं म्हणून मी डोळे उघडले तर तिथे कोणीच नव्हते. वळून पाहिले तर तो आणि ती तिथेच होते. तो तिचा हाथांना नीट पाहत होता. "किती भाजलेत गं तुझे हाथ?" ती त्याला समजावत म्हणाली "संसार म्हणालास की हे सगळं येतच, सोन्या. कळेल तुला. वेळ आली की, तुला ही कळेल. उद्या तू मोठा होशील.. तुझं लग्नं होईल.. तू तुझ्या बायकोची संसारात मदत करत जा.. मग तिचे हाथ गुळ-गुळीत राहतील." इतके मोठे शब्द त्याला कळाले असतील का? हा प्रश्नं माझ्या मनात आलाच होता तितक्यात त्याने विचारला- "संसार म्हणजे काय गं?" ती हसली आणि म्हणाली- "वेळ आली की कळेल." तो म्हणाला- "आई गं, भूक लागलीये!" ती उठणार तितक्यात तो म्हणाला- "नको.. तू थांब.. नको मला काही! तुझे हाथ भाजलेत. मला भूक नाहीये. तू इथेच बस." मी माझे डोळे मिटून घेतले. आज भरपूर वर्षांनी पुन्हा तिची खूप आठवण येत होती. यशाचे शिखर गाठले होते मी आज. पण आजू-बाजूला कोणीच नाही. घड्याला कडे पाहिले तर ८ वाजले होते. जेवण बनवायची वेळ आली होती. तसाच तडक उठलो, हाथ-पाय-तोंड धुतले, आवरलं आणि कपडे बदलून किचन मध्ये आलो. Coils वर भांडे ठेवले आणि फोडणीच्या तयारीला लागलो. कांदा चिरत होतो तर कांद्यामुळे डोळ्यात पाणी आले. आईची आठवण तर येतच होती पण कांद्यामुळे आलेल्या अश्रूंनी माझ्या weak side ला जरा आधार दिला. कांदा चिरता-चिरता बोट कापले तर तसेच ते पाण्याखाली धरले आणि वाहते रक्त थांबायची वाट पाहू लागलो. भाजी बनवतच होतो तितक्यात भांड्यावरील झाकण उचलायला गेलो आणि हाताला जोरदार चटका बसला. पुन्हा थंड पाण्यात हाथ धरला आणि "आई गं!" हेच शब्द बोलून गेलो. ती तिथेच समोर होती. ती माझा जवळ आली आणि म्हणाली- "आरे संसार संसार.. जसा तवा चुल्यावर.. आधी हातला चटके.. तेंव्हा मिळते भाकर!!" तो लहान मुलगा आता तिचा बरोबर नव्हता. मी विचारला- "तो लहान मुलगा कुठे गेला?" ती माझा जवळ आली आणि माझा केसांमधून हाथ फिरवून म्हणाली- "काळजी घे.. सोन्या.. तुझी आणि तिची पण." तितक्यात मागून कोणीतरी शर्ट ओढला. मागे वळून पाहिलं तर तोच लहान मुलगा माझ्या मागे उभा होता. मी वळून तिचा कडे पाहिले तर ती माझा कडे हसून म्हणाली- "मोठा झालास.. असाच अजून मोठा हो.. खूप प्रगती कर.. आणि मी सांगितलेला लक्षात ठेव.. तिचे हाथ गुळ-गुळीत राहावेत असं वाटत असेल तर आयुष्यभर असे चटके हसत हसत सहन कर!" मला खूप बरं वाटत होता "हो गं, आई.. मी घेईन तिची काळजी! Promise!!" असं म्हणून मी डोळे मिटले आणि मनातल्या मनात हसलो. डोळे उघडले तर ती तिथे नव्हती, तो ही दिसत नव्हता. खिशातून wallet काढलं आणि फोटो कडे एक-टक पाहत राहिलो. शेजारी "तिचा" फोटो ही होता. आज इतक्या वर्षांनी संसारचा पहिला अर्थ कळाला होता. २२ वर्ष जिने माझ्या साठी अनेक चटके खाल्ले होते तिचाच कडून.